कमी पैशात चांगले रिटर्न्स हवे असतील तर एसआयपी हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो.
त्यामुळे बहुतांशजण दर महिन्याला काही ना काही गुंतवणूक एसआयपीमध्ये करतात.
तुम्हाला 10 वर्षांनी 50 लाख रुपये हवे असतील तर आता महिन्याला किती रुपयांची एसआयपी गुंतवावे लागतील?
दरमहा 22 हजार रुपयांची एसआयपी केल्यास त्यावर किमान 12 टक्के रिटर्न मिळाले तर 50 लाख रुपये मिळतील.
10 वर्षांनी दरमहा 22 हजार रुपय एसआयपीने 51 लाख 11 हजार 460 रुपये रक्कम गोळा केलेली असेल.
यात तुमची गुंतवणूक 26 लाख 40 हजार इतकी असेल. तर त्यावरील रिटर्न 24 लाख 71 हजार 460 रुपये इतके असेल.
जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी वाढवला तर ही रक्कम आणखी वाढू शकते.
एसआयपी गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन घ्या.