एसआयपी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान द्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आणि मोठी रक्कम उभारू शकता. तुम्हाला ५०० रुपयांपासून सुरुवात करता येईल. दरम्यान SIP मुळे जास्त पैसा कसा कमावता येतो? त्यात गुंतवणूक का करावी? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
एसआयपी गुंतवणुकीचा कालावधी आणि रक्कमेत लवचिकता आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता.
याशिवाय, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ते थांबवू शकता आणि तुमच्या SIP मधून पैसे काढू शकता.
जेव्हा तुम्ही वेळोवेळी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच, जर बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले असतील, तर तुम्हाला जास्त युनिट्स वाटप मिळतील. जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा मिळालेल्या युनिट्सची संख्या कमी असेल.
बाजारातील चढउताराच्या परिस्थितीतही तुमचे खर्च सरासरी राहतात. म्हणजेच बाजार घसरला तरी तुम्ही तोट्यात जात नाही. जेव्हा बाजार तेजीत असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळते.
एसआयपीमध्ये चक्रवाढीचा फायदा प्रचंड आहे. म्हणूनच एसआयपी दीर्घकाळासाठी केली पाहिजे, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढीचा फायदा होईल.
चक्रवाढीमुळे तुम्ही गुंतवलेल्या रकमेवरच तुम्हाला परतावा मिळते असे नाही. उलट, तुम्हाला आधीच्या रिटर्नवरदेखील रिटर्न्स मिळतात.
एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही ठराविक वेळेसाठी बचत करायला शिकता. म्हणजेच तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक कितीही पैसे गुंतवायचे असतात. यामुळे तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते.