बिहारच्या कर्पूरी ठाकुर यांना यंदा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. बिहारला मिळालेला हा चौथा भारतरत्न पुरस्कार ठरला आहे.
सर्वाधिक भारतरत्न कोणत्या राज्यांना मिळाले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? या यादीत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे पाहूयात...
तेलंगणा, ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश आणि पंजाबला प्रत्येक 1 भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
गुजरातमधील 2 व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे. तर कर्नाटकमधील 3 व्यक्तींना हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.
कर्पूरी ठाकुर यांच्या रुपाने बिहार चौथा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
पश्चिम बंगालला 6 भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्र आणि तामिळनाडूला प्रत्येकी 8 भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत. या यादीत ही दोन्ही राज्य संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत.
भारतरत्न पुरस्कार मिळालेले सर्वाधिक मान्यवर हे उत्तर प्रदेशमधील आहेत. उत्तर प्रदेशला 9 भारतरत्न पुरस्कार मिळालेत.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानला प्रत्येकी 1 भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.