वडिलांनी लहानपणापासून लावलेल्या एका सवयीने बनवलं IAS; तुम्हीही लावा मुलांना ही शिस्त

उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे राहणाऱ्या वैष्णवी पालने जर कठोर परिश्रम घेतले तर आयुष्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसल्याचं सिद्ध केलं आहे.

युपीएससी परीक्षेत 62 वी रँक वैष्णवीने 2022 मधील युपीएससी परीक्षेत 62 वी रँक मिळवत आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. वैष्णवीने चौथ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली.

वडील व्यापारी, आई शिक्षिका

वैष्णवीचे वडील व्यापारी असून, आई एक शिक्षिका आहे. दोघांनीही मुलीच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नव्हतं. मुलीनेही IAS होत पांग फेडलं.

इकॉनॉमिक्समध्ये डिग्री

वैष्णवीने गोंडामधूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत गेली होती. तिथे लेडी श्रीराम कॉलेजातून तिने इकॉनॉमिक्समध्ये डिग्री मिळवली.

वडिलांनी लावली वृत्तपत्र वाचण्याची सवय

वैष्णवीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिलं आहे. वडिलांनी आपल्याला लहानपणी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली होती, ज्याचा आपल्याला फायदा झाल्याचं वैष्णवी सांगते.

वृत्तपत्रातून मिळाली IAS होण्याची प्रेरणा

मला वृत्तपत्रातून जिल्हा दंडाधिकारी, एसपी काय काम करतात हे समजायचं. यातूनच मला पुढे जाऊन IAS होण्याची प्रेरणा मिळाली असं वैष्णवी सांगते.

UPSC मुलाखतीमधील प्रश्न

UPSC मुलाखतीत वैष्णवीला विचारण्यात आलं होतं की, जर तुम्ही उद्या DM झालात आणि तेथील एसपीचं मागील दंडाधिकाऱ्यांशी जुळत नव्हतं अशा स्थितीत काय कराल?

यावर वैष्णवीने मी सकारात्कमपणे नव्याने त्यांच्यासह सुरुवात करेन.

VIEW ALL

Read Next Story