Sex पासून अध्यात्मापर्यंत... ओशो यांचे विचार वाचून व्हाल हैराण
ओशो म्हणतात, 'जगातील सर्वात मोठं भय म्हणते इतरांचं मत. ज्या क्षणी तुम्ही या गर्दीची तमा बाळगत नाही त्या क्षणी तुम्ही त्यांच्यापैकी नसता. तुम्ही शेळी नव्हे सिंह असता. तुमच्या मनात स्वातंत्र्याची गर्जना असते.'
ओशोंच्या सांगण्यानुसार, 'जेव्हा प्रेम व्यक्त केलं जातं तेव्हा ते शरीरावाटे सर्वप्रथम व्यक्त होतं. प्रणयाचं रुप धारण करतं. (Sex) जेव्हा ते बुद्धिनं व्यक्त केलं जातं तेव्हा त्याचा स्तर उंचावलेला असतो. ज्यावेळी ही भावना तुमच्या आत्मातून व्यक्त होते तेव्हा तिची प्रार्थना झालेली असते.'
'एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करा पण त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य द्या. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करा पण, सुरुवातीपासूनच हे स्पष्ट करा की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावणार नाही', असं ओशो म्हणतात.
'मी माझं आयुष्य दोन तत्त्वांवर जगलो, एक म्हणजे मी असं जगलो जणू काही आजचा दिवस माझ्या जीवनातील अखेरचा दिवस आहे आणि दुसरं म्हणजे मी अजरामर आहे', जीवनाकडे पाहण्याचा हा ओशोंचा दृष्टीकोन.
'स्त्रीत्वं हे पुरुषत्त्वाहून बलशाली आहे. कोणतीही मृदू गोष्ट कठीण गोष्टीहूनही ताकदवान आहे. पाणीही दगडाहून शक्तीशाली आहे', ओशो कायम सांगतात.
'मी जगण्यावर प्रेम करतो म्हणून सोहळा आणि प्रत्येत गोष्ट साजरा करण्याची शिकवण मी देतो. शरीरापासून आत्म्यापर्यंत, शारीरिकतेपासून अध्यात्मापर्यंत आणि (Sex) प्रणयापर्यंत माझ्यासाठी सर्वकाही पवित्र आहे', असं ओशोंची शिकवण सांगते.
'सतर्कता कायमच एखाद्या चमत्कारासारखं काम करते', त्यांचे हे शब्द कायम लक्षात ठेवण्याजोगे.
'एकटं राहणं खुप सुरेख आहे, एखाद्याच्या प्रेमात असणंही सुंदर आहे, अनेकांसोबत असणंही छानच आहे. ते एकमेकांना पूरक आहेत, इथं कोणताही विरोधाभास नाही', असं ओशो म्हणतात.