सर्दी-खोकला वाढलाय? आता घरीच बनवा आयुर्वेदिक Vicks

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. अशावेळी घरगुती उपचार करुनही तुम्ही यावर मात करु शकता. तुम्ही घरीच विक्स तयार करु शकता

घरच्या घरी विक्स बनवण्यासाठी तुम्हाला तीन साहित्य लागतील. तूप 2 चमचे, 10-12 कापूर, अर्धा चमचा काळे मीठ

सगळ्यात पहिले एक पॅन घ्या आणि त्यात दोन चमचे तूप टाकून गरम करा

आता यात पूजेसाठी वापरण्यात येणारे 10 ते 12 कापूर टाका व काळे मीठ टाका

हे सर्व साहित्य व्यवस्थित वितळवून घ्या. जेव्हा या मिश्रणातून धुर यायला लागेल तेव्हा एका दुसऱ्या भांड्यात हे मिश्रण ओतून घ्या

मिश्रण थंड झाल्यानंतर ते विक्ससारखे दिसायला लागेल हे विक्स तुम्ही लहान मुलांच्या पायाच्या तळव्याला आणि छातीवर लावू शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story