गॅस सिलिंडरचे दर कमी होतील

सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीवर 200 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे आता 1 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरसाठी 200 रुपये कमी मोजावे लागणार आहेत.

2,000 च्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय

आरबीआयने मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. आरबीयाने नोटा बदलण्यासाठी दिलेली चार महिन्यांची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट करा

UIDAIने जाहीर केले आहे की आधार कार्ड युजर 14 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतात.

क्रेडिट कार्डचे नियमही बदलणार

अॅक्सिस बँकेच्या मॅग्नम क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी 1 सप्टेंबर 2023 पासून बदल होणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून नवीन नियम लागू होतील.

IPO चे नवीन नियम लागू

सेबीने आयपीओ बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची अंतिम मुदत बदलली आहे. नवीन नियम 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणाऱ्या सर्व IPO साठी लागू होतील.

सीएनजी-पीएनजी गॅसच्या किमतीत बदल

सीएनजी-पीएनजी गॅसच्या किमती महिन्याच्या पहिल्या दिवशी नव्या पद्धतीने ठरवल्या जातात. 1 सप्टेंबर 2023 पासून त्यांच्या किमतीत फरक असण्याची शक्यता आहे.

डिमॅट अकाऊंट नामांकनाची अंतिम मुदत

डिमॅट खात्यात नामांकन करण्याची अंतिम मुदतही याच महिन्यात संपत आहे. नामनिर्देशन नसलेले डिमॅट खाते सेबीद्वारे निष्क्रिय मानले जाईल.

पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवटची संधी

जर या महिन्याच्या अखेरीस पॅन-आधार लिंक केले नाही, तर सप्टेंबर महिन्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 रोजी ते पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story