ई-बससाठी चार्जर स्टेशन्स उभारणार

स्वच्छ आणि पर्यावरणपूरक 9-मीटर- प्रकारातल्या या 10 ई-बस डोंगराच्या वरच्या भागातल्या मंदिर परिसरात भाविकांची वाहतूक करतील. या ई-बससाठी चार्जर स्टेशन्स उभारले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तिरुपती देवस्थानने मानले आभार

TTD ट्रस्टने या देणगी बद्दल MEIL चे आभार मानले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप याप्रसंगी तिरुमला इथं उपस्थित होते.

इंधनाच्या खर्चात कपात

तिरुमला घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. डिझेल इंधन न वापरता इलेक्ट्रिक बसेसचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन घट होण्यास तसंच इंधनाच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल.

ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेडच्या बस

मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड अर्थात एमईआयएल या कंपनीची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेडने तिरुमाला तिरुपती देवस्थानाला (TTD) ला 10 इलेक्ट्रिक बसेस भेट स्वरुपात दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक बसची भेट

तिरुपतीला दक्षिणा देण्याच्या प्रथेच्या अनेक कहाण्या तुम्ही वाचल्या असतील. पण आता तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस भेट म्हणून मिळाल्या आहेत

VIEW ALL

Read Next Story