तिरुपती बालाजी मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी नवे नियम लागू, आताच पाहा यादी. तिरुपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या, विना टोकन दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना साधारण 30 ते 40 तासांचा वेळ लागत आहेत. वाढता उकाडा पाहता आता ही प्रणालीही बदलणार आहे.
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुप्रभात सेवेत असणारा विवेकाधीन कोटा संस्थानाकडून मागे घेण्यात आला आहे. ज्यामुळं सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन वेळेत 20 मिनिटांची बचत होईल.
गुरुवारी एकांतममध्ये Tiruppavada Seva करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं भाविकांचा अर्था तास वाचणार आहे.
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी संस्थानकडून खासगी VIP पत्रकं स्वीकारली जाणार नसल्याचं मंदिर संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
सर्वसामान्य भाविकांचं हित लक्षात घेत मंदिर संस्थाननं हे निर्णय़ घेतले आहेत. या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला काही दिवसांनी सुरुवात होणार आहे.
संस्थानकडून सर्व भाविक आणि व्हीआयपींना सदर निर्णयामध्ये सहकार्. करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्याच्या घडीला तिरुपती मंदिरात सकाळच्या वेळी थोमला सेवा, मध्यान्न सेवा आणि रात्रीच्या वेळी आणखी एक सेवा दिली जाते.
यामध्ये सकाळच्या सेवेत सर्वांना सहभागी होता येतं, तर रात्रीची सेवा ही पूर्ण खासगी असून त्यावेळी अर्च, परिचारक आणि आचार्य पुरुषांचीच उपस्थिती असते.
तुम्हीही तिरुपतीच्या दर्शनासाठी येण्याचा बेत आखत असाल, तर मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाच्या सुविधांबाबत अधिक माहिती घेऊ शकता.