आग्रात ताजमहल आहे, त्या जमिनीवर आधी काय होतं?


आग्रातला ताजमहल सात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं. प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात.


पण ज्या ठिकाणी ताजमहल उभारण्यात आलं आहे, त्या जमिनीवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. या जमिनीवर अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत.


बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये इतिहाससतज्ज्ञांचा संदर्भ देत ताजमहल असलेल्या जमिनीवर आधी एक हवेली होती असं म्हटलं आहे.


बीबीसीच्या रिपोर्टनुसार शाहजहांने जेव्हा ताजमहल बनवला त्याआधी त्याने अधिकृत रित्या ती जमीन विकत घेतली.


या जमिनीचे मालक राजा जयसिंह होते आणि त्याची कागदपत्र आजही संग्रही आहेत. मुगल कागदपत्र जपून ठेवायचे असं म्हटलं जात होतं.


याआधी राजस्थानच्या जयपूर घराण्यानेही या जमिनीवर दावा केला होता. ही जमीन त्यांच्या घराण्यातील राजा महाराजांची होती असं त्यांनी म्हटलं होतं.


राजस्थानच्या उप-मुख्यमंत्री आणि जयपूर राजघराण्यातील सदस्य असलेल्या दीया कुमारी यांनीही ही जमीन राजा जयसिंह यांची असल्याचं सांगितलं होतं.

VIEW ALL

Read Next Story