अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील

Published by: Zee Team | Oct 17, 2023

अंबानींहूनही मोठं घर

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण अंबानींहूनही मोठ्या घरात भारतातील एक महाराणी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचं नाव आहे राधिकाराजे गायकवाड.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

वास्तूची मालकी

राधिकाराजे आणि त्यांचं कुटुंब वडोदरा येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये राहतात. या वास्तूची मालकी गायकवाड कुटुंबाकडेच आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

महालाची सूत्र

शाही कुटुंबांचे वंशज हीज हायनेस समरजीतसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड यांच्या हाती सध्या या महालाची सूत्र आहेत.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

खासगी निवास

जगातील सर्वात मोठा खासगी निवास म्हणून या वास्तूला ओळखलं जातं. ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या बकिंघम पॅलेसहून हा महाल चारपट मोठा आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

उपलब्ध माहितीनुसार गुजरातमधील हा महाल 700 एकरांच्या भूखंडावर तयार करण्यात आला असून, त्याचं क्षेत्रफळ 3,04,92, 000 इतकं आहे. 170 हून अधिक खोल्या असणाऱ्या या पॅलेसची निर्मीती सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी 1890 मध्ये केली होती.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

क्षेत्रफळ

राहिला मुद्दा अंबानींच्या घराचा, तर त्यांच्या घराचं क्षेत्रफळ आहे 48780 चौरस फूट. थोडक्यात लक्ष्मीविलास पॅलेस त्याहून कैक पटींनी मोठं आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

महाल उभारणीची किंमत

त्या काळात हा महाल उभा करण्यासाठी साधारण 180,000 GBP म्हणजेच 1,82,57,711.45 रुपये इतका खर्च आला होता.

Published by: Zee Team | Oct 17, 2023

VIEW ALL

Read Next Story