तुम्ही अनेकांना कानातून मळ बाहेर काढताना पाहिले असेल.
याला ईयर वॅक्स असे म्हणतात.
कानातील वॅक्स हा गडद नारंगी, लाल, पिवळ्या रंगाचा असू शकतो.
हा वॅक्स कानातील एका नळीमध्ये असतो.
कानात असलेले अनेक ग्लॅंड्स या मेणाला बनवतात.
वॅक्स कानातील स्किनला जखम होण्यापासून वाचवतो.
बॅक्टेरीया, फंगस आणि पाण्यापासून कानाचे संरक्षण करतो.
कानात जास्त वॅक्स झाला की त्रास व्हायला सुरुवात होते.
अनेकदा यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
यामुळे डॉक्टर्स पाण्याने कान स्वच्छ करण्याचा सल्ला देतात.