IPS विवेक यांनी लठ्ठपणावर कशी केली मात

Jun 29,2023

सोपा नव्हता मार्ग

लठ्ठपणातून पुन्हा तंदुरस्त होण्याचा मार्ग हा काही सोपा नसतो. जीमपासून योगापर्यंत बऱ्याच मेहनतीनंतर लठ्ठपणावर मात करता येते

कोणाची होतेय एवढी चर्चा?

परिवर्तन करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे विवेक राज सिंह कुकरेले. त्यांनी 138 किलोवरुन त्यांचे वजन 90 किलोवर आणलं आहे.

सध्या कुठे आहेत IPS विवेक?

IPS विवेक हे सध्या गुवाहाटीमध्ये कायदा व सुव्यवस्था डीआयजी आहेत. ते 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत

अन् असं वाढत गेलं वजन

IPS विवेक यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते 8वीत होते तेव्हा त्यांचे वजन 88 किलो होते. UPSCच्या तयारीदरम्यान, त्याXच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बिघडल्या, ज्यामुळे वजन आणखी वाढले.

प्रशिक्षणादरम्यान 100च्या पुढे गेले वजन

जेव्हा मी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणासाठी गेलो होतो, तेव्हा माझे वजन 134 किलो होते, असे IPS विवेक यांनी सांगितले.

कमी झाल्यानंतर पुन्हा वाढलं वजन

IPS विवेक यांनी धावण्यास सुरुवात करुन वजन 138 वरुन 104 वर आणले होते. मात्र खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ते पुन्हा 138वर पोहोचले.

48 किलो वजन कसे कमी केले?

वजन कमी करण्यासाठी त्यांनी प्रथम चालायला सुरुवात केली, तसेच ते दररोज किती पावले चाललो याचा मागोवा घेत असे.

रोज किती चालायचे IPS विवेक?

IPS विवेक दररोज सुमारे 30 हजार पावले चालत असे. कधी कधी तर ते 40 हजार पावलेही चालायचे. वजन कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा त्यांना झाला.

रोज किती कॅलरीज हव्या होत्या?

वजन कमी करण्यासाठी त्यांनी रोजच्या कॅलरीजपेक्षा 300-400 कॅलरीज कमी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी दररोज 1.2 ते 2.0 ग्रॅम प्रथिने घेण्यास सुरुवात केली.

बिर्यानी खात खात कमी केले वजन

या संपूर्ण प्रवासात IPS विवेक यांनी सकस आहारासोबतच बिर्याणी, पुरी, चाट, पिझ्झा असे त्यांचे आवडते पदार्थही खाल्ले.

सध्या काय करतात IPS विवेक?

आज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी IPS विवेक हे दररोज 10 ते 12 किलोमीटर धावतात. तसेच त्यांना सायकल चालवण्याची आवड आहे. (फोटो सौजन्य - विवेक राज सिंह / Instagram)

VIEW ALL

Read Next Story