ट्रेन तिकीटावर असणाऱ्या PNR चा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या 8 रंजक गोष्टी

ट्रेन तिकीटावर असणाऱ्या PNR चा फूल फॉर्म Passenger Name Record असा आहे. यासंबंधी 8 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

ट्रेनमध्ये आरक्षण करणाऱ्या प्रवाशाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी PNR नंबर देण्यात आलेला असतो.

हा 10 अंकी क्रमांक असतो, जो प्रत्येक तिकीटासाठी दिला जातो.

पीएनआरमध्ये प्रवास मार्गासह प्रवाशाचं नाव, ट्रेन नंबर, प्रवास तारीख आणि सीटची माहिती असते.

प्रवासी पीएनआरच्या माध्यमातून आपल्या बुकिंगचं स्टेटस चेक करु शकतात. यातून तिकीट कंफर्म, वेटिंग किंवा RAC आहे याची माहिती मिळते.

जर अनेक प्रवासी एकत्रित प्रवास करत असतील तर त्यांच्या तिकीटावर एकच पीएनआर क्रमांक असतो.

भारतीय रेल्वे रिझर्व्हेशन आणि कॅन्सलेशन सुरळीत व्हावं यासाठी पीएनआरचा डेटाबेस मॅनेज करतं.

प्रवासादरम्यान टीसी किंवा रेल्वे कर्मचारी पीएनआरच्या माध्मयातून योग्य व्यक्ती प्रवास करत आहे की नाही याची खातरजमा करतात.

VIEW ALL

Read Next Story