कुठून आला 'पटियाला पेग' हा शब्द, किस्सा अतिशय मजेशीर?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 01,2023
'पटियाला पेग' चे उत्पादन पटियालाच्या शाही कुटुंबापासून झाली होती. हे महाराजा भूपिंदर सिंह यांच्या शासन काळात झालं. ज्यांनी 1990 ते 1938 हा काळ पटियाला महाराजाची उपाधी धारण केली.
महाराजा सर भूपिंदर सिंह एक भारतीय शाही आणि क्रिकेट खेळाडू होते.
1900 ते 1938 पर्यंत ब्रिटिश भारतात पटियाला कारकिर्दित शासक महाराज होते. त्यांचा जन्म एका सिंधू शाही जाट सिख कुटुंबात झाला.
महाराज भूपिंदर सिंह पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आजोबा होते.
पुस्तक कॅप्टन अमरिंदर सिंह : द पीपल्स महाराजा यामध्ये 'पटियाला पेग'च्या उत्पत्तीच्या घटनेचे वर्णन केले आहे.
अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, वर्ष 1920मध्ये 'पटियाला पेग'ची कशी निर्मिती झालीय. आजोबांना आयरिश पोलो टीमविरुद्ध विजयी होण्याचा दृढ संकल्पातून सुरुवात झाली.
आपल्या राजकीय शैलीनुसार महाराजा भूपिंदर सिंह यांनी खेळाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आयरीश संघाला एका भव्य पार्टीचे आमंत्रण दिले. त्यांनी व्हिस्कीसोबत 'पटियाला पेग' तयार केला. महत्त्वाचं म्हणजे ही खास करून इंग्रजी खेळाडूंकरता बनवण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी खेळाच्या दिवशी ब्रिटिश खेळाडूंमध्ये हँगओव्हरचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. महाराजांच्या क्रिकेटपट्टूंविरुद्ध खेळायला असमर्थ राहिले.
आयरीश संघाने सामना जिंकण्यात अपयशी ठरले आणि महाराजा भूपिंदर सिंह यांचा संघ विजयी झाला. असं म्हटलं जातं की, महाराजा भूपिंदर सिंह यांनी क्रिकेट सामन्यानंतर ब्रिटिश खेळाडूंकरता पुन्हा एकदा पेग बनवला.
अमरिंदर सिंह यांनी सांगितलं होतं की, एका पेगमध्ये 120 मिलि व्हिस्की असते.