भारतावर आजवर कैक परकीय आक्रमणं झाली. पण, या देशावर सर्वात प्रथम हल्ला करणाऱ्या मुघल योद्ध्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम.
अरब इतिहासाविषयीच्या चचनामा या पुस्तकानुसार त्यानं 712 सीई दरम्यान सिंध प्रांताचा अखेरचा हिंदू राजा दाहीर याचा पराभव केला होता.
बीबीसीनं चचनामाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार आठव्या शतकामध्ये बगददाचे गव्हर्नर हज्जाज बिन युसूफच्या आदेशानुसार मोहम्मद बिन कासिमनं हा हल्ला केला होता.
उपलब्ध माहितीनुसार श्रीलंकेनं बगदादच्या गव्हर्नरसाठी सागरी मार्गानं काही भेटी पाठवण्यात आल्या असून, त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. श्रीलंकेनं ही जहाजं दीबल बंदरात लुटत जहाजावरील लोकांना बंदी केलं.
यानातर गव्हर्नर युसूफनं राजा दाहीरला पत्र लिहित लुटलेल्या मालासह इतर सामान आणि महिला परत देण्याचे आदेश दिले. ही लूट आमच्या प्रांतात झाली नसल्याचं सांगत हा आदेश राजानं दुर्लक्षित ठेवला आणि हे प्रकरण आणखी चिघळलं.
ही लूट सागरी चाच्यांनी केली असून, त्यात राजा दाहीरचा फायदा नाही असंही इतिहासात म्हटलं गेलं होतं.