रेल्वेच्या रुळांजवळ 'हे' कपाटासारखे बॉक्स का ठेवलेले असतात?

ट्रेनमधून प्रवास करताना रुळांशेजारी असणारे अॅल्यूमिनिअमचे बॉक्स नेहमी आपल्या नजरेस पडतात. पण हे बॉक्स नेमके का लावलेले असतात? आणि कशासाठी लावलेले असतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

एक्सल काऊंटर बॉक्सचं नेमकं काम काय?

यामध्ये एक स्टोरेज डिव्हाइस असतो, जे थेट रुळाशी जोडलेला असतो. ट्रेनच्या दोन चाकांना एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या एक्सलचं ते मोजमाप करतं.

ट्रेनच्या एक्सलची मोजणी

याच्या आधारे दर 5 किमीवर ट्रेनच्या एक्सलची मोजणी केली जाते. जेणेकरुन ट्रेन स्थानकातून निघाले तेव्हा जितकी चाकं होती तितकीच चाकं कायम आहेत याची माहिती मिळेल.

दुर्घटना किंवा अपघात

जर ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाली किंवा दोन डबे वेगळे झाले तर 'एक्सल काऊंटर बॉक्स' एक्सलची मोजणी करुन नुकतीच रुळावरुन गेलेल्या ट्रेनमध्ये किती चाकं कमी आहेत याची माहिती देते.

डब्यांची योग्य माहिती

यावरुन रेल्वेला नेमक्या कोणत्या जागी दोन डबे वेगळे झाले याची माहिती मिळण्यास मदत होते. तसंच रेल्वे दुर्घटनेनंतरील तपासातही मदत होते.

बॉक्समध्ये 5 किमीचं अंतर

'एक्सल काऊंटर बॉक्स' रेल्वे जाताना त्याच्या एक्सलची मोजणी करुन याची माहिती तात्काळ पुढील बॉक्सला पाठवतं. पुढील बॉक्स 5 किमी अंतरावर असतो आणि तोदेखील हेच काम करतो.

...तर रेड सिग्नल होतो

एक्सलची संख्या मागील 'एक्सल काऊंटर बॉक्सशी' साम्य साधणारी नसल्यास पुढील 'एक्सल काऊंटर बॉक्स' ट्रेनच्या सिग्नलला लाल करतो.

VIEW ALL

Read Next Story