भारतात 'अभियंता दिन' 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ? जाणून घ्या यामागील कारण

अभियंत्याना समाजाच्या पायाभुत सुविधांसाठी कामकऱ्यांपैकी एक मानले जाते . आज म्हणजेच 15 सप्टेंबर , हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो .

पण मग हा दिवस 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ? याचे उत्तर म्हणजे या दिवशी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा वाढदिवस असतो . त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिलं आहे.

सर विश्वेश्वरैय्या हे कर्नाटकचे होते .15 सप्टेंबर 1861 साली मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्यांचा जन्म झाला . ते भारताचे पहिले अभियंते होते. त्यांनी आयुष्यात जनसेवेसाठी बरीच कामे केली . 1962 मध्ये त्यांनी शंभरी गाठली आणि 14 एप्रिल 1962 ला त्यांचा मृत्यू झाला .

भारतात सर्वत्र 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो . मात्र सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना फार कमी लोकं ओळखतात . त्यांचे भारताच्या अधूनिक पायाभरणीत फार मोठे योगदान आहे.

गावांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या यंत्रणा विश्वेश्वरैय्यांनी बनवल्या आहेत . पुण्यातील खडकवासला , हैद्राबाद , म्हैसूर आदी ठिकाणांना पुरग्रस्त होण्यापासून वाचवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे .

अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे . 1955 साली त्यांना भारतरत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले . ब्रिटीशांनी विश्वेश्वरैय्यांना त्यांच्या कामगिरीसाठी 'नाइट' (knight) ही पदवी दिली होती .

सर्व अभियंत्यांसाठी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या पूजनिय आहेत . त्यांनी तेव्हा ठोस पाऊले उचली , म्हणून आज भारतात अभियांत्रिकीचे प्रशिक्षण सहजरित्या उपलब्ध होतं आहे . Engineer's Day 2024 भारतात सगळीकडे साजरा केला जातो आहे .

VIEW ALL

Read Next Story