आजकाल सर्वच ठिकाणी एस्केलेटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सहसा मॉल आणि रेल्वेस्थानक या ठिकाणी एस्केलेटरचा वापर सर्वाधिक केला जातो.
शॉपिंग माॉलमध्ये असलेले एस्केलेटर लोकांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मदत करतात.
कधी विचार केला आहे का ? एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला असे ब्रश का लावलेले जातात. नक्की ते काय काम करतात.
एस्केलेटरला दोन्ही बाजूला लावण्यात आलेले हे ब्रश सुरक्षिततेचे काम करतात.
जेव्हा एखादी व्यक्ती लक्ष न देता एस्केलेटरवरील पिवळ्या पट्टीबाहेर पाय ठेवते तेव्हा त्याव्यक्तीला ब्रश पाय आत ठेवण्यासाठी सुचित करते.
जर वस्तू किंवा कपडे पिवळ्या पट्टीच्या बाहेर असेल तर हा ब्रश इशारा म्हणून काम करतो. तो कापड बाहेर फेकण्यास सुरूवात करतो ज्यामुळे कापड मशीनमध्ये अडकू नये. म्हणजेच हा ब्रश एखादी दुर्घटना होण्यापासून वाचवते.
एस्केलेटरच्या दोन्ही बाजूस बसवण्यात आलेले ब्रश हे एकप्रकारे सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून काम करतात.
काही लोक या एक्सलेटर ब्रशने शूज साफ करतात.असे करणे टाळले पाहिजे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.