एकादशीच्या दिवशी भात का खात नाही?

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.मात्र धर्मशास्त्रानुसार यादिवशी भात खाण्यास मनाई आहे . असे का?

हिंदुधर्मानुसार एकादशीच्या दिवशी भातचे सेवन करणे मांसाहारा समान समजले जाते . शास्त्रानुसार त्यांना नरकवासी म्हटले जाते.

विष्णु पुराणानुसार एकादशीला भात खाणं पाप समजलं जातं.

एकादशीच्या दिवशी भात खाण्यास मनाई आहे कारण, या दिवशी सात्विक आहार घेतला जातो म्हणजेच देवतांचे अन्न म्हणतात. यामध्ये तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जात नाही.

हिंदुधर्मामध्ये अशी समज आहे की, या दिवशी भाताचे सेवन केल्याने मानवाचा पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रूपात जन्म होतो.

भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. एकादशीच्या दिवशी शरीरात जेवढं पाणी कमी तेवढं व्रत सात्विक मानले जाते.

पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो.त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन विचलित होते आणि व्रतामध्ये अडथळे येण्याची भीती असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story