राष्ट्रवादीने 4 राज्यांमध्ये किमान 6 टक्के मतं मिळालेली असण्याचा निकष पूर्ण झाला नाही, यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
1) लोकसभेतील किमान 2 टक्के जागा तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकणं. 2) लोकसभेत 4 खासदार, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं 3) किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या तीन अटींची पूर्तता करावी लागते.
नागालँड विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळालेल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेतला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? नियम काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.