बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?

अर्थसंकल्पाच्या दिवशी प्रत्येक अर्थमंत्री हातामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाची बॅग घेऊन जातात, पण या पिशवीचा रंग लाल का असतो याचा कधी विचार केला आहे का ?

बजेट ब्रीफकेस ही ब्रिटिशांच्या संबंधित आहे.तज्ज्ञांच्या मते 1860 मध्ये ब्रिटिश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी प्रथम राणीच्या मोनोग्रामसह लाल रंगाची लेजर बॅग सादर केली होती.

ब्रिटिशांनी आणलेल्या या बॅगला ग्लॅडस्टोन बॉक्स म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश देशात यामधूनच अर्थसंकल्प सादर केला जातो.

लाल रंग निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सॅक्स कोबर्ग गोथा या सैन्यामध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बजेट ब्रीफकेसचा रंग लाल ठेवण्यात आला आहे.

दुसरं कारण म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटी राणी एलिझाबेथच्या प्रतिनिधीचे स्पॅनिश राजदूत ब्लैक पुडिंग यांनी एक गोड पदार्थाने भरलेली ब्रीफकेस भेट म्हणून दिली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

ज्यादिवशी बजेट सादर केला जातो त्यावेळी अनेक घोषणा केल्या जातात.त्यामुळे त्यात महत्त्वाचे कागजपत्रच ठेवल्याने ही बॅगसुद्धा महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे.

लाल रंग लक्ष वेधून घेतो त्यामुळे बॅग आकर्षक दिसण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो.

लाल रंग हा भारतीय परंपरेचं प्रतिक मानलं जातं.भरपूरवेळा धार्मिक ग्रंथ झाकून ठेवण्यासाठी देखील लाल रंगाचा कापड वापरलं जात असे.

VIEW ALL

Read Next Story