त्वचा आणि केसांना उन्हामुळे होणारे नुकसान कसं टाळता येईल यावर घरगुती उपाय यावर लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय.
युट्यूबवर पहिले 5 हजार फॉलोवर्स कसे वाढवावे? असा सर्च देखील भारतातील लोक करतात.
भारतात क्रिकेट आणि फुटबॉलचं वेड असलं तरी चांगली कबड्डी कशी खेळायची? याची उत्सुकता भारतीयांना आहे.
भारतीयांमध्ये कारचं मोठं फ्याड आहे. त्यामुळे भारतात कार विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. अशातच कारची मायलेज कशी वाढवायची? याचा शोध भारतीय गुगलवर घेतात.
बैठी खेळामध्ये बुद्धीबळाचं आकर्षण चांगलंच वाढलंय. त्यामुळे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कसं व्हावं? याची शोध देखील घेतला जातोय.
रक्षाबंधनादिवशी आपल्या लाडक्या बहिणीला कोणतं गिफ्ट द्यावं? याचा शोध देखील गुगलवरून तरुणांनी घेतला आहे.
खरी कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखावी? असा प्रश्न देखील यंदाच्या वर्षात अनेकांना पडला आहे.
आधारसह पॅन लिंक कसं तपासायचं? असा प्रश्न देखील भारतीयांना अनेकदा सर्च केलाय.
Whatsapp ने यंदा चॅनेलची नवी भानगड सुरू केली. त्यामुळे नवीन व्हॅट्स अँप चॅनेल कसं सुरू करायचा? याचा शोध देखील अनेकांनी घेतलाय.
इन्टाग्रामवर यंदा अनेकांनी नवीन अकाऊंट सुरू केले आहेत. त्यामुळे इन्स्टाग्रामवर ब्लू टिक कसे मिळवायचे? याची उत्सुकता देखील अनेकांना आहे.