बहिण साराची हजेरी

अर्जुन तेंडुलकरचा उत्साह वाढवण्यासाठी त्याची बहिण सारा तेंडुलकरही मैदानावर उपस्थित होती.

रोहित शर्माकडून डेब्यू कॅप

आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने डेब्यू कॅप दिली. यावेळी अर्जुन भावूक झाला होता.

51 सामन्यात कर्णधारपद

सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून खेळताना तब्बल 51 सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. यात 30 सामन्यात विजय तर 21 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

सचिनची आयपीएल कामगिरी

सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये 2008 ते 2013 दरम्यान एकूण 78 सामने खेळला. यात त्याने 2334 धावा केल्या.

पिता-पुत्रांची पहिली जोडी

अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण करताच आणखी एक अनोख विक्रम जमा झाला. आयपीएलमध्ये खेळणारी पिता-पुत्रांची पहिली जोडी ठरलीय.

सचिननेही दिल्या होत्या 5 धावा

खास गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी केली. त्यावेळी त्यानेही पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या.

पहिल्या षटकात पाच धावा

अर्जुन तेंडुलकरने डावा हाताने वेगवान गोलंदाजी करतो. पहिल्या षटकात त्याने पाच धावा दिल्या. तर 2 षटकात एकूण 17 धावा दिल्या.

अर्जुनचं आयपीएल पदार्पण

मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या हंगामात अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. केकेआरविरुद्ध त्याने वानखेडे मैदानावर पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story