विराट आणि यशस्वीच्या इन्स्टा स्टोरीचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.
यशस्वीनेही या इन्स्टास्टोरीला रिप्लाय देताना, "धन्यवाद भावा, हे कौतुक माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे," असं म्हटलं आहे.
विराटने इन्स्टास्टोरीवरुन, "मागील काही काळात मी पाहिलेली ही सर्वोत्तम बॅटींग आहे," असं म्हणत यशस्वीचा फोटो पोस्ट केला होता.
अगदी विराट कोहलीपासून ते हर्षा भोगलेंपर्यंत अनेकांनी यशस्वीचं कौतुक केलं आहे.
यशस्वीची धमाकेदार खेळी पाहून आजी-माजी सर्वच खेळाडू प्रभावित झाले आहेत.
या खेळीसाठी यशस्वीला मॅन ऑफ द मॅचबरोबर इतरही अनेक पुरस्कार मिळाले.
यशस्वीने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे राजस्थानने कोलकात्याने दिलेलं 150 धावांचं आव्हान 13.1 षटकांमध्येच पूर्ण केलं.
यापूर्वी हा विक्रम के. एल. राहुलच्या नावावर होता. के. एल. राहुलने 2018 मध्ये अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत यशस्वीने IPL मध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम स्वत:च्या नावे केला.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
विराट कोलहीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत केलं यशस्वीचं कौतुक