या यादीतील पाचव्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं नाव पाहून बसेल धक्का

टी-20 करिअरमध्ये सर्वाधिक एकेरी म्हणजे सिंगल्स धावा काढणाऱ्या फलंदाजांची ही यादी पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

Swapnil Ghangale
Apr 14,2024

नवव्या स्थानी बंगळुरुचा खेळाडू

दिनेश कार्तिक सर्वाधिक एकेरी धावा काढणाऱ्यांच्या यादीत नवव्या स्थानी आहे. त्याने 1426 एकेरी धावा काढल्यात.

आठव्या स्थानी सीएसकेचा माजी खेळाडू

सर्वाधिक सिंगल्स धावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंबती रायडू आठव्या स्थानी आहे. त्याच्या नावावर 1495 एकेरी धावा आहेत.

सातव्या क्रमांकावर मराठी खेळाडू

टी-20 मध्ये सर्वाधिक एकेरी धावा काढणारा सातव्या क्रमांकावरील खेळाडू आहे अजिंक्य रहाणे! त्याने आतापर्यंत 1499 एकेरी धावा काढल्यात.

यादीत धोनीचाही समावेश

सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्र सिंह धोनी या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याने 1537 सिंगल्स काढल्या आहेत.

एकमेव परदेशी खेळाडू

टॉप 9 मध्ये असलेले एकमेव भारतीय म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर. 1678 एकेरी धावा काढून वॉर्नर यादीत पाचव्या स्थानी आहे.

चौथ्या स्थानी सीएसकेचा माजी क्रिकेटपटू

भारताचाच सुरेश रैना सर्वाधिक एकेरी धावा काढणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने 1708 एकेरी धावा केल्यात.

हिटमॅन तिसऱ्या स्थानी

सर्वाधिक एकेरी धावा धावणाऱ्यांच्या यादीत अव्वल 3 मध्ये तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याच्यावावर 1939 एकेरी धावांची नोंद आहे.

दुसऱ्या स्थानी पंजाबचा कर्णधार

दुसऱ्या स्थानी पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाचा यंदाच्या म्हणजेच 2024 आयपीएलच्या पर्वातील कर्णधार शिखर धवन आहे. त्याने एकूण 2102 एकेरी धावा काढल्या आहेत.

विराट पहिल्या क्रमांकावर

सर्वाधिक एकेरी धावा काढणारा खेळाडू आहे विराट कोहली! विराट कोहलीने 2482 एकेरी धावा काढल्या आहेत.

किती किलोमीटर धावलाय कोहली?

म्हणजे 22 यार्डची खेळपट्टी आहे असं गृहित धरलं तर 2482 धावांचं अंतर 50 किलोमीटर इतकं होतं. कोहली एवढं अंतर एकेरी धावा काढण्यासाठी धावाला आहे.

VIEW ALL

Read Next Story