तुळशी वृंदावनाला हिंदू धर्मात खूप मानले जाते. प्रत्येकाच्या घरासमोर तुळसीचे रोप असतेच.
तुळशीचे रोप सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
आता उन्हाळा सुरू आहे. कडक उन्हामुळं तुळशीचे रोप सुकून जाते.
तुळशीचे रोप सदाबहार राहण्यासाठी या टिप्स आजमावून पाहा
दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान तुळशीच्या रोपावर सुती कपडा किंवा लाल कपडा ठेवा
तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडी सावली येते
तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार ठेवण्यासाठी त्याच्या मुळांशी थोडे कच्चे दूध टाका
तुळशीचे रोप लावताना मातीच्या आत नारळाच्या शेंडी आतमध्ये ठेवा. त्यामुळं त्यात पाणी मुरेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)