डायबेटिज वाढल्यास पायांवर दिसतात 5 लक्षण, वेळीच व्हा सावधान

व्यायामाचा अभाव, जंगफूडचं सेवन, अनुवांशिक कारण इत्यादींमुळे डायबेटिजच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. डायबेटिजवर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर यामुळे अजून आजारांना आमंत्रण मिळू शकते.

रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की शरीर तुम्हाला विविध संकेत देऊ लागतं. तसेच पायांवर सुद्धा काही लक्षणं दिसू लागतात. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास धोका टळू शकतो.

पायांना मुंग्या येणे :

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर पायांना मुंग्या येणे, जळजळ होणे, पाय सुन्न पडणे इत्यादी लक्षणं जाणवतात. याकडे दुर्लक्ष केल्यास अल्सरचा धोका वाढू शकतो.

पायात पेटके येणे :

रक्तात साखरेची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते. त्यामुळे पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होतो ज्यामुळे पायात पेटके येणे, पाय दुखणे, अशक्तपणा येणे इत्यादी लक्षण जाणवू लागतात.

पायांवर व्रण उठणे :

रक्तात साखरेची पातळी वाढली की खराब रक्तभिसरणामुळे पायात अल्सर होऊ शकतो. यामुळे पायांवर व्रण उठू शकतात. तेव्हा अशी लक्षण जाणवल्यास डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्यावेत.

पायांना बुरशी येणे :

डायबेटिज वाढलं की त्वचा कोरडी पडते, ज्यामुळे पायांना तडे पडतात. डायबेटिज रुग्णांच्या पायांवर बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असतो.

पायांना लालसरपणा आणि सूज :

डायबिटीजमुळे अनेकदा हाडे कमकुवत होऊन सांधे दुखीची समस्या वाढते. यामुळे पाय फ्रॅक्चर किंवा तो निखळणे अशा घटना होतात.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story