येत्या बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे.
वर्षांला 24 एकादशी येत असतात म्हणजे महिन्याला दोन. त्यातील आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकदाशी महत्त्वाची आणि मोठी मानली जाते.
आषाढी एकादशीचा उपवास करताना चुका केल्यास उपवासाचे पुण्य मिळत नाही. एकादशीचा उपवासाचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत.
आषाढी एकादशी असो किंवा कुठलीही एकादशीला तांदूळ खाऊ नयेत. उपवास केला नसला तरी तांदळापासून तयार होणारे पदार्थ खाऊ नयेत.
घेवडा किंवा वाल्याचा शेंगा, वांगी, लसून - कांदा एकादशीला खाऊ नयेत.
मासांहार, दारु, कुठलंही व्यसन एकादशीला करायच नाही आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)