शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी


मलेरिया, डेन्यू सारखे आजार झाल्यावर अनेकदा शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्स कमी झाल्यावर अशक्तपणा येतो आणि आजार बरे होण्यास उशीर लागतो.


तेव्हा शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.

कीवी :

कीवी हे फळ व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडंट्सने भरपूर असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच कीवीमुळे रेड ब्लड सेल्स वाढतात परिणामी प्लेटलेट्स काउंट वाढवण्यासाठी मदत मिळते. डेंग्यू झालेल्या रुग्णांनी कीवी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

डाळिंब :

डाळिंब हे फळ व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट्सनी भरपूर असतं. डाळिंबामध्ये आयरनचे प्रमाण जास्त असते जे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. तसेच यामुळे एनीमियाची समस्या सुद्धा दूर होते.

आंबट फळं :

व्हिटॅमिन सी ने भरपूर असणाऱ्या आंबट फळांमुळे प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते. या फळांमध्ये संत्र, लिंबू, आवळा या फळांचा समावेश आहे. यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

पपई :

पपई ही प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. पपईत एसिटोजेनिन नावाचे फाइटोकेमिकल असते, जे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत करते. पपईच्या पानांचा रस प्यायल्याने पांढऱ्या पेशी वाढतात. ज्यामुळे डेंग्यू पासून वाचण्यास मदत मिळते.

बीट :

बीटमध्ये भरपूर आयरन असल्याने हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते. तसेच याच्या सेवनाने प्लेटलेट्सची संख्या सुद्धा वाढते.

मनुका :

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मनुके सुद्धा प्रभावी ठरतात. मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने त्यातून आयरन मिळते. ज्यामुळे प्लेटलेट्स वेगाने वाढण्यास मदत मिळते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story