भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र अनेक भारतीय नोकरी, व्यवसाय, शिक्षण इत्यादींच्या निमित्ताने जगातील इतर देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले आहेत.
आज जगातील ८ देशांबद्दल जाणून घेऊयात जिथे सर्वाधिक भारतीय लोक राहत असून ते आर्थिक, सामाजिक प्रगतीत आपलं योगदान दिलं आहे. २०२४ मध्ये विदेश मंत्रालयाकडून हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.
अमेरिकेमध्ये ५४ लाख ९ हजार ६२ इतके भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक राहतात.
संयुक्त अरब आमीरातमध्ये ३५ लाख ६८ हजार ८४८ भारतीय लोक राहतात. यूएईच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीमध्ये भारतीयांचा मोठा वाटा आहे.
मलेशियामध्ये २९ लाख १४ हजार १२७ भारतीय आणि भारतीय वंशाची लोक राहतात. येथील राजकारणात, शैक्षणिक क्षेत्रात आणि व्यापारामध्ये भारतीय लोकांनी आपली छाप सोडली.
भारतातून दरवर्षी अनेक लोक एक चांगलं जीवन जगण्यासाठी कॅनडामध्ये शिफ्ट होतात. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांची संख्या ही २८ लाख ७५ हजार ९५४ इतकी आहे.
सौदी अरेबियामध्ये २४ लाख ६३ हजार ५०९ भारतीय आणि भारतीय वंशाची लोक राहतात.
म्यानमार देशामध्ये एकूण २० लाख २ हजार ६६० भारतीय आणि भारतीय वंशाची लोक राहतात.
ब्रिटनमध्ये राजकारणापासून ते व्यापार आणि कला क्षेत्रांपर्यंत भारतीय लोकांनी झेंडा गाडला आहे. इथे १८ लाख ६४ हजार ३१८ भारतीय आणि भारतीय वंशाची लोक राहत आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये तब्बल १७ लाख भारतीय लोक राहतात.