वायु प्रदूषणामुळे कापला जातोय तुमचा खिसा!


वायु प्रदूषणामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे.


पण वायू प्रदूषणामुळे तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही फरक पडतो. हे तुम्हाला माहिती आहे का?


फक्त वायु प्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी लाखो-करोडोंचे नुकसान होते.


वायु प्रदुषण थांबवण्यासाठी दर वर्षी सरकार अनेक योजना आणतात, ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.


2019 साली भारतात उत्पादकतेचा अभाव, कामावर अनुपस्थिती आणि अकाली मृत्यू यामुळे अर्थव्यवस्थेला 95 अब्ज डॉलरेचे नुकसान झाले आहे.


संपूर्ण जगाचा विचार केला तर, वायु प्रदूषणामुळे दरवर्षी 600 अब्ज यूरोजचे नुकसान होते.


युनायटेड नेशनच्या रिपोर्ट्सनुसार जगातील 3000 मोठ्या कंपन्यांमुळे 54 टक्के हवा दुषित होते.


2021 मध्ये भारतात जवळपास 20 लाख लोकांचा मृत्यू वायु प्रदूषणामुळे झाला आहे. हा आकडा 1990 सालच्या तुलनेत 60 टक्क्यांनी जास्त आहे.

VIEW ALL

Read Next Story