यंदा आषाढ तळणीसाठी गव्हाच्या खुशखुशीत कापण्या करुन पाहा
गव्हाचे पीठ, गूळ, एक कप पाणी, तेल, बेसन, तळण्यासाठी तेल
सर्वप्रथम एका भांड्यात गूळ घेऊन त्यात एक कप पाणी टाकून मंद आचेवर ठेवा.
गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळेपर्यंत हलक्या हाताने सतत हलवत राहा व गुळाचे पाणी करुन घ्या
आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीपुरते मीठ आणि थोडे बेसन पीठ टाका आता यात कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ एकत्र करा.
त्यानंतर जे गुळाचे पाणी केलं आहे ते थोड थोड टाकून पीठ मळून घ्या. आता 15 ते 20 मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्या
आता पोळी लाटून घ्या त्यानंतर शंकरपाळ्यासारख्या आकार देऊन कापण्या करुन घ्या. त्यानंतर कापण्या तेलात तळून घ्या