आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये आचार्य चाणक्य यांनी कोणती कामे घाईघाईत करु नयेत, याबद्दल सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यवसायात कोणताही निर्णय हा घाईघाईत घेऊ नये. अन्यथा छोटी चूक नंतर खूप महागात पडते.
त्याचबरोबर कोणाशीही लगेच संबंध निर्माण करू नका. नाही तर परत पश्चात्ताप होईल. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या.
चाणक्य यांच्या मते, पैशाचे व्यवहार हे तोंडी ठेवू नका. सर्व व्यवहार हे कागदावरती ठेवा.
जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. सर्व गोष्टी विचारात घेऊन निर्णय घ्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)