बाळ पोटात असताना आई होणाऱ्या महिलेला तिच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
मोड आलेले बटाटे : केवळ गरोदर महिलाच नाही तर इतरही लोकांनी मोड आलेले बटाटे खाणं टाळायला हवं. मोड आलेल्या बटाट्यांमध्ये अनेक टॉक्सिन आढळतात. यामुळे आई आणि बाळाला त्रास होऊ शकतो. मोड आलेल्या बटाट्यांमध्ये सोलानिन आढळते ज्यामुळे लहान मुलांच्या वाढीवर वाईट प्रभाव पडतो.
गरोदर महिलांनी एलोवेराशी निगडित कोणतीही गोष्ट खाणं टाळावं. यामुळे पेल्विक रक्तस्राव होऊ शकतो, जे पुढे जाऊन गर्भपाताचे कारण ठरू शकते.
प्राण्यांचं लिव्हर हे पौष्टिक मानलं जातं, पण जर हे लिव्हर कोणत्या आजारी प्राण्याचं असेल तर यामुळे गरोदर महिलेला नुकसान पोहोचू शकते. लिव्हरमध्ये व्हिटॅमिन ए आणि कोलेस्ट्रॉलची उच्च मात्रा असते ज्यामुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊन गर्भपात होऊ शकतो.
गरोदर महिलेने कच्च्या दुधाचे सेवन करू नये. यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते.
गरोदरपणात अर्ध कच्च अन्न कधीही खाऊ नये. खास करून कच्च्या अंड्याचं सेवन करू नये कारण यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते.
शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूप चांगल्या ठरतात. परंतु याचे सेवन गरोदर महिलांनी करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.
गरोदरपणात हिरवी पपई खाऊ नये असा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते कारण हिरव्या पपईमध्ये एक विशेष प्रकारचे एन्झाइम आढळते ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, जे गर्भपाताचे कारण बनते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)