फ्रिज ही सध्या काळाची गरज बनली आहे. पूर्वी फक्त हॉटेलमध्ये दिसणाऱ्या फ्रिजचा आता घराघरात वापर केला जातो.
फ्रिजचा वापर हा अन्न पदार्थ दीर्घकाळ फ्रेश रहावेत यासाठी केला जातो. त्यामुळे जेवण खराब होतं नाही.
फ्रिजच्या वरती अनेकजण खूप साऱ्या वस्तू ठेवतात. मात्र असं करणं वास्तूच्या दृष्टीने चांगलं नसतं.
अनेकजणांची सवय असते की ते फ्रिजच्या वरती पैसे ठेवतात, मात्र असं केल्याने पैशांची हानी होऊ शकते.
काहीजण फ्रिजवर मेटलच्या वस्तू जसे ट्रॉफी फ्लॉवर पॉट ठेवतात. मात्र तसं करणं वास्तू शास्त्राच्यानुसार चुकीचं मानलं जातं.
बरेचजण फ्रिजवर औषध गोळ्या ठेवतात. मात्र तसं करू नये असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात.
फ्रिजला तुम्ही दक्षिण- पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवायला हवं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)