हिवाळ्यात प्रामुख्यानं खाल्ल्या जाणाऱ्या या बाजरीच्या भाकरीमध्ये प्रथिनं, तंतुमय घटक आणि अनेक खनिज घटक समाविष्ट असतात.
बाजरीच्या भाकरीसोबत मांसाहारी पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय मध आणि बाजरीची भाकरी खाल्ल्यासही जळजळ आणि अपचनाचा त्रास होतो.
अती तिखट, तळलेले आणि पचण्यास जड असणारे पदार्थ बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ नयेत, यामुळं पचनक्रिया बिघडते.
उष्ण गुणधर्माच्या भाज्या आणि बाजरीची भाकरी एकत्र खाऊ नयेत. या दोन्ही पदार्थांमधील घटक उष्ण असल्यामुळं शरीरावर त्याचे विपरित परिणाम होतात. बाजरीची भाकरी आणि मुळ्याची भाजी खाल्ल्यास त्वचेवर व्रण येणं, अॅलर्जी होणं अशा समस्या उदभवतात.
गॅस, अपचन आणि अॅसिडीटीचा अधिक त्रास असणाऱ्यांनी बाजरीच्या भाकरीचं अती प्रमाणात सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)