चहामध्ये टाका चिमूठभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे


चहा प्यायल्या शिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. चहाची चव वाढवण्यासाठी अनेकजण त्यात चहा मसाला, आलं, दुध, साखर इत्यादी गोष्टी टाकतात.


परंतु याशिवाय चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत.


भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो.


चहात चिमूठभर मीठ मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.


चहात मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी आरोग्य चांगले राहते.


चिमूठभर मीठ घातलेल्या चहाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते.


मिठाच्या सेवनाने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा चहात मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.


चहात मीठ मिसळून प्यायल्याने त्वचा ऍलर्जी, इंफेक्शन पासून दूर राहते. चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासाठी सुद्धा हे मदत करते.


चहात चिमूठभर मीठ मिसळून प्यायल्याने घशातील इंफेक्शन, खवखव आणि बॅक्टेरिया दूर होतात.

मिठाचा चहा कसा करायचा?

मिठाचा चहा बनवण्यासाठी काही विशेष कृती नाही. तुम्ही दररोज जो चहा बनावता त्यात चिमूठभर मीठ मिसळा. तुम्ही ब्लॅक टी किंवा ग्रीन टीमध्ये सुद्धा चिमूठभर मीठ मिसळून पिऊ शकता.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story