World Rabies Day 2024: कुत्र्यांव्यतिरिक्त 'हे' प्राणीही पसरवतात रेबीज

Sep 28,2024

कुत्रा

सर्वाधिक जास्त रेबीजच्या केसेस कुत्रा चावल्यामुळे होतात. रेबीज पसरवणाऱ्या बहुतेक कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश होतो.

वटवाघुळ

वटवाघुळाच्या चाव्याने किंवा स्क्रॅचमुळेही रेबीजचा धोका असतो.

मांजर

मांजर चावण्याच्या घटना अनेकदा घडतात पण अनेकांना हे माहित नाही की मांजरीच्या चाव्याव्दारेही रेबीज पसरू शकतो.

कोल्हा

कोल्हा चावल्यानेही रेबीजचा संसर्ग होऊ शकतो.

ससा

ससा चावण्याच्या घटना फार दुर्मिळ असल्या तरी हे जाणून घेणे गरजेचे आहे की काही केसेसमध्ये ससा चावल्यानेही रेबीज होऊ शकतो.

खारुताई

सुंदर खारुताई अनेकांना आवडते. परंतु ही सुंदर खारुताईसुद्धा चावल्यास रेबीजच्या घातक विषाणूची लागण होऊ शकते.

उंदीर

उंदीर सारखा छोटासा प्राणी देखील रेबीज विषाणूचा वाहक आहे. त्यामुळे उंदीर चावल्यानेही रेबीज होऊ शकतो. (All Photos Credit: Freepik, Pixabay)


(इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य तत्त्वावर दिलेली आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story