हिवाळ्यात 'गूळ आणि तूप' एकत्र खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Pooja Pawar
Dec 19,2024


हिवाळ्यात शरीराशी निगडित अनेक समस्या जाणवतात. अशावेळी तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणं गरजेचं ठरत.


आयुर्वेदात गूळ आणि तूप यांचे मिश्रण शक्तिशाली औषध मानले जाते. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात.


गूळ आणि तुपाचे सेवन हे पचनसाठी फायदेशीर ठरते. गुळात फायबर असतं तर तुपात लॅक्सेटिव असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


गूळ आणि तुपामध्ये व्हिटॅमिन-ई, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि खोकला, ताप, सर्दी सारखे आजार दूर राहतात.


गूळ आणि तुपाचे सेवन शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर पडतात.


अनेकदा अतिरिक्त तणाव येतो किंवा मूड स्विंग्स होतात. अशावेळी गूळ आणि तुपाचे सेवन केल्याने त्यात एंटी-डिप्रेसेंट गुण असतात ज्यामुळे मानसिक तणाव दूर होतो.


गूळ आणि तुपामध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते. ज्यामुळे हाड मजबूत राहतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

VIEW ALL

Read Next Story