बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चिरतरुण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
माधुरी दीक्षित अभिनयाबरोबरच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमधूनही कमाई करते.
माधुरी दीक्षितने तिच्या मालकीची एक ऑफिस स्पेस म्हणजेच कार्यालयीन जागा भाडेतत्वावर दिल्याचं वृत्त आहे.
भाडेतत्वावर माधुरीने दिलेल्या मुंबईमधील या कार्यालयाचं एका महिन्याचं भाडं पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
अंधेरी पश्चिममधील ही कार्यालयीन जागा माधुरीने एका खासगी कंपनीला भाडेतत्वावर दिली आहे.
माधुरीच्या मालकीची ही ऑफिस स्पेस 1 हजार 594.24 स्वेअर फूटांची आहे.
माधुरी या जागेसाठी खासगी कंपनीकडून भाडं म्हणून तब्बल 3 लाख रुपये दर महिन्याला घेणार आहे.
अनेकांसाठी माधुरी एका महिन्यासाठी आकारत असलेली ही रक्कम म्हणजे अर्ध्या वर्षाचा पगार झाला.