लोणच्याचं नाव घेतलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चवीला जर लोणचं असेल तर साधा वरण भात सुद्धा लगेच फस्त होतो.
लोणच्यात प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था चांगली ठेवण्याच काम करतात.
लोणचं करताना अधिकतर लिंबू, आवळा अशा आंबट पदार्थांचा उपयोग केला जातो. या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लोणच्यात लिंबू आणि मसाल्यांचा समावेश असल्याने याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात येण्यास मदत होते.
हळद, जिरं, तिळ, असे लोणच्यात अनेक प्रकारचे मसाले असतात. हे मसाले अँटी ऑक्सिडंटनी भरपूर असतात, ज्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
लोणच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे भरपूर पोषकतत्व असतात जे हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतात.
लोणचं तयार करताना वापरण्यात येणारे मसाले जसे की लसूण, कोथिंबीर, जिरं इत्यादी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
लोणच्याचे सेवन केल्याने भूक वाढण्यास मदत होते आणि तसेच पचनक्रिया सुधारते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)