आतड्यांचं आरोग्य उत्तम ठेवत पचनसंस्था सुधारण्यासाठी भेंडी गुणकारी ठरते. यामध्ये असणारे तंतुमय घटक शरीरासाठी फायद्याचे असतात.
भेंडीमध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म, तंतुमय घटक आढळतात. ज्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम राहते.
भेंडी भिजवलेलं पाणी प्यायल्यास त्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांना भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
भेंडीमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असल्यामुळं वजन घटण्यास यामुळं मदत मिळते.
भेंडी भिजवलेल्या पाण्याच्या सेवनानं त्वचेचं सौंदर्य अबाधित राहतं.
शरीरातील दुषित घटक शरीराबाहेर टाकण्यास भेंडीची मदत होते. यासाठी भेंडी पाण्यात भिजवून ते प्यायल्यास कैक फायदे होतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)