पुरुषांसाठी ठरतात वरदान
हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेक जण आज 7 सिड्सचं सेवन करतात. या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील भोपळ्याच्या बिया म्हणजे Pumpkin Seeds या पुरुषांसाठी वरदान ठरतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये सेलेनियम, फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं. यामुळे पुरुषांमधील कॅन्सरशी लढण्यासाठी या बिया फायदेशीर ठरतात.
पुरुषांना लठ्ठपणाची समस्या असल्यास त्यांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्यास अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते.
पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन केल्यास त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. याशिवाय शरीरातील रक्तप्रवाहाचं संतुलन सुधारण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया झिंकमध्ये समृद्ध असतात, म्हणून त्यांच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारू शकते.
पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी मजबूत करण्यासाठी आणि निरोगी हार्मोनल प्रक्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन फायदेशीर ठरतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)