लग्नखरेदीसाठी मुंबईतील बेस्ट मार्केट तुम्हाला माहितेय का ?

लग्न समारंभाची घाई सगळीकडे सुरु झाली आहे, त्यामुळे लग्नखरेदीसाठी आपण घराबाहेर पडतोय.

पण नेमकं कोणत्या मार्केटमध्ये खरेदीला जावं हा एकच प्रश्न असतो.

लग्नखरेदीसाठी ही आहेत मुंबईतील बेस्ट 7 मार्केट

भुलेश्वर मार्केट

ठिकाण - भुलेश्वर लग्नखरेदीपासून इतर सणांच्या खरेदीसाठी भुलेश्वर मार्केट ओळखलं जातं.लग्नासाठी खास लेहंगा, सलवार -सूट, सूट सेट खरेदीला जाऊ शकता.

हिंदमाता मार्केट

ठिकाण - दादर ईस्ट लग्नबस्तासाठी उत्तम ठिकाण असं म्हंटल जाणारं हे हिंदमाता मार्केट आहे. भरजरी शालू, पैठणी, बांधणी किंवा तुम्हाला जशी हवी तशी साडी या ठकाणाहून तुम्हाला खरेदी करता येईल.

मनीष मार्केट

ठिकाण - अंधेरी येथे विकल्या जाणाऱ्या साड्यांच्या किमती १५० रुपयांपासून ४० ते ५० हजारांपर्यंत आहेत.

नटराज मार्केट

ठिकाण - मालाड सर्व प्रकारच्या दागिन्यांपासून ते नवीन डिझाईनच्या लेटेस्ट कपडे याठिकाणी तुम्हाला मिळतील.

दादर मार्केट

ठिकाण - दादर वेस्ट पारंपरिक दागिने ते वेस्टर्न लुक साठी लागणारे दागिने हे सगळं या ठिकाणी तुम्हाला हमखास मिळेल.

क्रॉफेर्ड मार्केट

ठिकाण - सी.एस.टी(साऊथ बॉंबे) मेकअप पासून ते लग्नासाठी चप्पला हे बारीक सारीक गोष्ट हमखास मिळते.

मंगलदास मार्केट

ठिकाण - काळभादेवी मंगलगिरी कॉटन, चंदेरी, सुपरनेट कोटा, भगलपुरी सिल्क, शिफॉन, बनारसी यांसारखे अनेक कपडय़ांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत.

VIEW ALL

Read Next Story