'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा

हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक्सच्या समस्येचा धोका वाढतो

हल्ली अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक्सची समस्येचा धोका प्रचंड वाढतो असं सांगितलं जातं.

हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण

शरीरामधील काही ठराविक अवयव दुखत असतील तर ते हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे असं समजावं.

सतत दुखत असेल तर...

गुडघे, मांड्या आणि पाय सतत दुखत असतील तर हे कोलेस्ट्रॉल वाढीचं लक्षण आहे असं समजता येईल.

स्नायू दुखावतात, ठणकतात

आर्टरीज (रक्तवाहिन्यांना) अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे नुकसान होतं. त्यामुळे रक्त पुरवठ्यावर परिमाण होऊन स्नायू दुखावतात आणि ठणकतात आणि वेदना होते.

स्नायूंना होणाऱ्या वेदना

पायऱ्या चढणे तसेच चालल्याने स्नायूंना होणाऱ्या या वेदना अधिक वाढतात आणि अनेकदा या अगदी असहाय्य होतात.

या समस्या जाणवत असतील तर...

तुम्हालाही या समस्या जाणवत असतील तर तातडीने तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल तपासून घ्या!

कोलेस्ट्रॉल किती असावं?

वयस्कर व्यक्तींमध्ये 200 ग्राम प्रति डीएल एवढं कोलेस्ट्रॉल असावं असं सांगितलं जातं.

प्रमाण 240 च्या वर गेलं तर...

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 240 च्या वर गेलं तर तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल अधिक आहे असं समजावं.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story