घराचं सौंदर्य वाढवतात 'ही' फुलझाडं; एकतरी लावून पाहा

मोगरा

मोगरा हे फुल फक्त बागेचे सौंदर्य वाढवत नाही तर त्याचा सुगंध घरात आणि वातावरणात दरवळत असतो. बहुतेकदा हे फुल धार्मिक समारंभ आणि विवाहसोहळ्यात वापरलं जातं.

सुर्यफुल

सुर्यफुल त्याच्या चमकदार रंगासोबतच मोठ्या आकारासाठी प्रसिद्ध आहे. हे रोप घरी लावल्याने चमक, प्रकाश, आनंद आणि शांततेची भावना येते.

जास्वंद

घराच्या अंगणात जास्वंदाची रोपे लावल्याने वातावरण प्रसन्न आणि आकर्षक राहतं.

डेझीचे फुल

डेझी फुले त्यांच्या चमकदार रंगामुळे आणि पातळ, सपाट पाकळ्यांनी वेढलेल्या आनंददायी सुगंधामुळे लोकांना आकर्षित करतात.

बोगनवेल फुल

उत्कृष्ट रंग आणि एका अनोख्या आकारासाठी बोगनवेलचं फुल ओळखलं जातं. या फुलामुळं, बोगनवेलच्या सुरेख अशा वेलीमुळं घरातील वातावरण आनंददायी राहतं.

चंद्रमल्लिका

चंद्रमल्लिकाला 'शेवंती' या नावाने ओळखलं जाणारं फुल. वेगवेगळे रंग आणि आकारांमध्ये ते उपलब्ध असतं. घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी या फुलझाडाला अनेकजण पसंती देतात.

गुलाब

गुलाबाचं फुल हे त्याच्या सुगंध आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. व्यवस्थित काळजी घेतल्यास गुलाबचं रोपटं जोमानं वाढतं. या फुलांचा बहरलेला रंग घराचं सौंदर्य वाढवतं.

चमेली

चमेलीच्या फुलाचा वापर विवाह, धार्मिक समारंभ आणि सणावारी केला जातो. घरातील वातावरणात शांतता आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी चमेलीची वेल अनेकांच्या घरी पाहायला मिळते.

गुलमोहर

गुलमोहरच्या चमकदार लाल-केशरी पाकळ्यांमुळे घराचे सौंदर्य वाढतं. नियमित पाणी दिल्याने रोप निरोगी आणि सुंदर राहतं. काहीशी फर्नसारखी पानं आणि उन्हाळ्यात केशरी-लाल फुलांचा बहर यासाठी गुलमोहर ओळखला जातो.

VIEW ALL

Read Next Story