बागकामाची आवड आवड असलेली अनेक मंडळी सहसा विविध प्रयोग करत असतात. घरातच पालक लावण्याचा प्रयोगही अनेकजण करतात.
घरातच कुंडीमध्ये पालक उगवल्यामुळं मऊ माती घ्या आणि त्यामध्ये काही प्रमाणात शेणखत टाका.
पालकसाठी खोल नव्हे, तर काहीशी रुंद कुंडी घ्यावी. या कुंडीत माती टाकल्यानंतर पालकच्या बिया मातीत चारही बाजूंनी टाका आणि हलक्या हातानं बियांवर दाब द्या.
पालकला जास्त उन्हाची गरज भासत नाही. त्यामुळं तुम्ही या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा जिथं थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
दिवसातून दोन वेळा पालकच्या कुंडीत पाणी टाका.
पालकची पानं 40 दिवसांच्या आत तयार होतात. एकदा ही पानं कापल्यानंतर पुढं तीन ते चार वेळा ही पानं कापता येतात.