1500-2000 रुपये किलो असलेल्या वेलचीचं रोपं आता घरातल्या कुंडीतच उगवा, ही आहे प्रोसेस

वेलची आरोग्यासाठी गुणकारी तर आहेच. पण पदार्थांमध्येही वेलची टाकल्यास त्याचा स्वाद वाढतो

अनेकांना बागकामाची आवड असते. घरातच्या कुंड्यांत विविध प्रकारची रोपं लावली जातात

तुम्ही घरातच वेलचीचं रोप लावू शकता. बाहेर 1500 ते 2000 रुपयांना मिळणारी वेलची तुम्ही घरातच लागवड करु शकता

सगळ्यात पहिले घरातील वेलची घेऊन त्याचे दाणे काढून घ्या. त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा

सकाळी पाण्यातून काढून चांगलं सुकवून घ्या. जेणेकरुन त्यातील दमटपणा निघून जाईल

आता मातीत चांगलं खत मिसळून घ्या आता त्यात वेलचीचे दाणे टाका आणि पाणी घाला. वेलचीचे रोप 10 ते 35 अंशाच्या तापमानापर्यंत आरामात उगवते

यानंतर 2 ते 3 महिन्यात रोप यायला सुरुवात होईल. तर, 3 ते 4 वर्षात त्याला फळ यायला सुरुवात होईल

वेलचीच्या झाडाला दिवसातून एकदा पाणी घालणे गरजेचे आहे. तसंच, महिन्यातून एकदा जैविक खाद्य टाका

VIEW ALL

Read Next Story