उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फळ फायदेशीर, जाणून घ्या गुणकारी फायदे

Apr 17,2024


वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवता. अशा वेळी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या...


उन्हाळा ऋतूमध्ये कैरीची चटणी, कैरीचे पन्हे, लोणचे, मुरांबा, कैरीचे तिखट-मीठ लावलेले चटपटीत सलाड बनवले जाते. अशी ही आंबटगोड कैरी आपल्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. आज आपण कैरीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

आतड्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी चे विपुल प्रमाण आढळून येते. जेव्हा आपण कैरीचे सेवन करतो तेव्हा, आतड्यांमध्ये पित्ताचा स्त्राव वाढतो. यामुळे, चरबीचे शोषण वाढते आणि हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे, आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यकृत आणि आतड्यांसंबंधी समस्या कमी करण्यासाठी कैरी फायदेशीर आहे.


डिहायड्रेशनची समस्या दूर होते भरपूर पाणी पिणे, थंड पेयांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कैरीची ही मदत घेऊ शकता. कैरीपासून बनवलेले पन्हे प्यायल्याने डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. उन्हाळ्यासाठी कैरीचे पन्हे हे अतिशय फायदेशीर पेय मानले जाते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कैरीमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. कैरीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. कच्ची कैरी हळद किंवा मीठ लावून खाल्ल्याने ही तोंडाला छान चव येते. कैरीचे सेवन केल्याने शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. शिवाय, पोट ही भरलेले राहते.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story